भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
वाशिम : रिधोराजवळ वाशिम-अकोला मार्गावर 3 मोठ्या वाहनांच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. रिधोराजवळ वाशिम-अकोला मार्गावर कंटेनर, टेम्पो आणि बसमध्ये विचित्र अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली. मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.