Breaking News

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणार्‍या एका विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ऋषिकेश आहेर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.ऋषिकेश हा अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगावचा रहिवासी होता. तो विद्यापीठात वाणिज्य विभागात दुसर्‍या वर्षाला शिकत होता. विद्यापीठाच्या वस्तीगृह 4 मध्ये तो राहायला होता. आज त्याचा दुसर्‍या सत्रातील पहिला पेपर होता. मात्र, सकाळीच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.