Breaking News

विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे यांना धक्का

विधानपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देऊन भाजपची गोची केली असून आता कराड व धस यांच्यात वन टू वन फाईट होणार अशी चर्चा असतानाच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी शेवटच्या सात मिनिटातच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा रहाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांना हा मोठा धक्काच असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
रमेश कराड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्वत: विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र अर्ज मागे घेण्यासाठी केवळ सात मिनिट वेळ शिल्लक होता. तेवढ्यात राकॉ पक्ष प्रमुखांकडून रमेश कराड यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे रमेश कराड यांना ऐनवेळी डावलले असून आता राकॉ आपली ताकद अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्या पाठीशी लावणार असून आता भाजपकडून सुरेश धस व राकॉ पुरस्कुत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.