Breaking News

पोलिसांनी फेसबुकद्वारे मृत तरुणीची ओळख पटवली


पुणे, दि. 17, मे - पुणे शहरातील लोहगाव परिसरातील पाटील वस्ती येथील एका अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून हत्येप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. कुठलाही पुरावा मागे नसताना केवळ हातावर गोंदलेले नाव आणि हातात असलेले कडे यावरून पोलिसांनी फेसबुकद्वारे मृत तरुणीची ओळख पटवली आणि आरोपीला अटक केली.
अयोध्या सुदाम वैद्य ( वय-27, रा.शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. बालाजी उर्फ गुरुजी वैजनाथ धाकतोडे (वय -27, रा.मुंजाबा वस्ती, विश्रातवाडी ) याला अटक केली तर त्याचा साथीदार अंड्या उर्फ अनिकेत सुनील खंडागळे ( वय- रा.सिद्धर्थनगर, लोहगाव) फरार आहे. लग्नासाठी तगादा लावल्यानेच आरोपीने तिची निर्घृण हत्या करत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता.

पाटील वस्ती येथील एका शेतात अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला होता. मृत तरुणीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजीमध्ये -इ व उजव्या हातावर इंग्रजीमध्ये -ूेवहूर असे गोंदलेले होते. उजव्या हातात काळ्या मण्याची माळ, पांढ-या धातुचे कडे, उजव्या हाताच्या बोटात पांढ-या धातुची अंगठी, उजव्या पायात पैंजण होते. आरोपीने तिला ठार मारून तिचा मृतदेह याठिकाणी आणून स्प्रेच्या सहाय्याने जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.