Breaking News

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून 28 लाख 40 हजार मंजूर


सोलापूर, दि. 17, मे - मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दुर्धर आजारावरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी 14 रुग्णांना 28 लाख 40 हज़ार निधी मंजूर झाला असून, मंजुरी पत्राचे वाटप विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. 

कर्करोग, हृदयरोग, मेंदूविकार, अपघातातील व पोटाच्या शस्त्रक्रिया अशा दुर्धर आजारावरील खर्चिक उपचाराकरिता राज्यसरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पालकमंत्री देशमुख यांच्या प्रयत्नातून निधीस मंजुरी मिळाली असून, गतवर्षी 1 कोटी 40 लाख निधी वाटप करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेतलेल्यानी गरजू लोकांना या योजनेबद्दल माहिती द्या. जेवढा प्रचार व प्रसार होईल तेवढ्या रुग्णांना आर्थिक मदत करता येईल, पैशावाचून उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन विजयकुमार देशमुख यांनी केले.