Breaking News

कार्यकारी अभियंता बाविस्करच्या मनमानीने पुणे साबां त्रस्त कर्मचारी महासंघाने बांधकाम मंत्र्यांना दिले निवेदन

पुणे/विशेष प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्हा परिषदेत 31 मार्च रोजी कार्यारंभ आदेश देऊन त्याच दिवशी मोजमाप पुस्तिकेत नोंद घेत तात्काळ देयके अदा करण्याचा पराक्रम करणारे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांचा पुणे साबांतील मनमानी कारभारही वादग्रस्त ठरला आहे. औरंगाबादच्या कामकाजाबाबत तब्बल दहा जनहीत याचिका दाखल होण्याच्या तयारीत असणार्‍या भरतकुमार बाविस्कर यांच्या विषयी पुणे व्हिव्हिआयपी सर्कीट हाऊसवर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी शनिवार दि. 12 मे रोजी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याच्या टोळीचे पुणे विभागाचे नेतृत्त्व बाविस्कर यांना देण्यात आले असून मंत्रालयापाठोपाठ पुणे साबांतही मोठा घोटाळा उघड झाला आहे.

शहर इलाखा विभागात काम करता करता विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्याची मोहीम राबविण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यावर होती, त्यानंतर विभागवार ही जबाबदारी विभागून देण्यात आली असून नाशिक विभागात अधिक्षक अभियंता तर पुणे विभागात कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर इमाने इतबारे पार पाडीत असल्याचा सुत्रांचा दावा आहे.
प्राप्त माहीतीनुसार सध्या पुणे साबांत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले भरतकुमार बाविस्कर हे पुण्यातील ढोले पाटील रोडवरील हॉटेल कपिलामध्ये दादांविषयी द्वेष पसर विणार्‍या बैठका घेण्यात स्वारस्य दाखवित असल्याचे समजते.
कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांचा सर्व्हिस ट्रक औरंगाबादपासून वादग्रस्त असून मनमानी हा त्यांच्या कार्यशैलीचा पिंड आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी कार्यारंभ आदेश म्हणजे वर्क आर्डर देऊन त्याच दिवशी मोजमाप पुस्तिकेत नोंद करून देयके काढण्याचा विक्रम भरतकुमार बाविस्कर यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. भरतकुमार बाविस्कर यांच्या औरंगाबाद जिल्हा परिषदेतील कामकाजाविरूध्द संभाजीराव डोणगावकर यांनी दाखल केलेल्या दोन याचिकांसह दहा जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल आहेत. यावरून भरतकुमार बाविस्कर यांच्या कुख्यातीचे परिमाण लक्षात येते.
पुणे साबांत रूजू झाल्यानंतरही भरतकुमार बाविस्कर यांची मनमानी सुरू असून या मनमानीविरूध्द महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कर्मचारी महासंघाने शनिवार दि. 12 मे रोजी दु. 4 वा. पुणे व्हिव्हिआयपी सर्कीट हाऊस येथे ना. चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे वृत्त आहे.
पुणे साबां विभागात अशा प्रकारची मनमानी करून भरतकुमार बाविस्कर यांनी लेखाशिर्ष 2216 अंतर्गत 24 कोटी तर लेखाशिर्ष 2059 अंतर्गत 75 कोटीची बोगस कामे करण्याचा सपाटा लावाल्याची माहीती प्राप्त आहे. (क्रमशः)

भरतकुमार बाविस्करांचे कारनामे
-----पुणे शासकीय विश्रामगृह (आयबी) चे स्वागत कक्ष कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचे खासगीकरण करून वार्षिक वीस लाखाचा ठेका सागर सर्व्हिसेसला देण्याचे प्रयोजन कु णाच्या परावानगीने? सरकारी कर्मचार्‍यांची सोय कुठे करणार?
---- राज्य राखीव दल (एसआरपी) बल गट 1 व 2 हडपसर, मेंटल हॉस्पीटल, येरवडा जेल, क्वीन्स गार्डन 15, 17, 18 विश्रामगृह ग्रीन सर्कीट हाऊस व्हिव्हिआयपी 1/2, राजभवन पुणे, मुंबई, महाबळेश्‍वर, ससून रूग्णालय इतकेच नाहीतर पुणे आयबी मधील खोली क्रमांक 27, 28, 29, 30, 31, 32 मध्ये अंदाजपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे काम न करता शासनाच्या निधीचा अपहार.
----हवेली उपविभागीय कार्यालय म्हणजे प्रांतांच्या कार्यालयात का देखभाल दुरूस्तीचे काम करतांना अंदाजपत्रकाला फाटा देऊन केलेला अपहार, यासारख्या अनेक मनमानी विषयी सविस्तर वृत्तांत उद्यापासून...

दादांना बदनाम करण्यासाठी बाविस्करने धाडली नोटीस
गेल्या दोन वर्षापासून ना. गिरीश बापट आणि आ. राहुल कुल यांच्या ताब्यात शासकीय विश्रामगृहाचे सुट आहेत. त्यांच्या कब्जात असलेल्या या सुटकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष क रणारे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी धनगर समाजाचे नेते, बाळासाहेब गावडे (माजी राज्यमंत्री दर्जा), राम गुंडीले, आ. बाळा भेगडे यांना केवळ पंधरा दिवसात सुट सोडण्याची नोटीस पाठवून पक्षपाती केल्याची चर्चा आहे. चंद्रकांत दादा पाटील पक्षपातीपणा करीत आहेत. असा संदेश जाणीवपुर्वक व्हायरल करण्यासाठी बाविस्कर यांनी हा उपद्व्याप केल्याची चर्चा साबांत आहे.