Breaking News

‘दलित उमेदवाराला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार’

बंगळूरू :-कर्नाटकाचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता 15 मे रोजी येणा़र्‍या निकालाक डे सर्वांचे लक्ष असतांनाच याचदरम्यान दलितासाठी आपण मुख्यमंत्रिपद सोडायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘दलितांसाठी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. हायक मांडने आदेश दिल्यास दलित उमेदवाराला मुख्यमंत्रिपद द्यायला मला काहीही हरकत नाही. ही माझी शेवटची निवडणूक होती. यापुढे राजकारणात तर असेल, मात्र निवडणूक लढणार नाही,’ असे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मतदानोत्तर चाचण्यांचा पुढील दोन दिवसांत मनोरंजनाचे साधन आहे. एक्झिट पोल हे त्या व्यक्तीसारखे आहेत ज्यांना पोहता येत नाही. मात्र, त्याला या गोष्टींचा दिलासा आहे की, तो यात बुडणार नाही. कारण त्याला नदीची खोली केवळ चार फुट सांगण्यात आले आहे. आपल्या पुढच्या ट्विटमध्ये सिद्धरामय्या म्हणाले, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि शुभचिंतकांनी मतदानोत्तर निष्कर्षांवरून चिंतित राहू नये. विकेंडला निश्‍चित होऊन आरोप करावा, आम्ही पुन्हा येत आहोत.