Breaking News

मुरूममाफियांनी लावला शेतकर्‍यांसह शासन करास चूना


कर्जत मुरूम विकण्यासाठी कर्जत तालुक्यातील अनेक डोंगर टेकट्या भुईसपाट केले जात आहेत. परंतु या उत्खननाकडे महसुल विभागातील प्रांत अधिकारी, तहसिलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. 

विशेष म्हणेज सध्या तालुक्यात जेसीबीच्या सहाय्याने भरदिवसा उत्खनन सुरू असल्याने शासनाचा कोठ्यावधीचा महसुल बुडत आहे. रस्त्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सध्या कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांना ना. राम शिंदे यांनी मंजुरी मिळून दिली. तसेच अनेक रस्ते डांबरी करणात बसविले आहेत. रस्ता दुरूस्ती व रस्ता रूंदीकरणासाठी लागणार्‍या मुरूमासाठी तालुक्यातील डोंगर, टेकडी पोखरण्याचे काम, कुकडी कॅनालवरील मुरूम, खाजगी पडीक जमिनी खोदुन मुरूम उचलला जात आहे. विशेष म्हणेज वनविभागाकडील वनक्षेत्रातील जंगलातील टेकडी, कपारी, व कोठेही खड्डा खोदुन मुरूम उचलला जात आहे. या मुरूम माफियांनी हजारो ब्रास मुरूमाची वाहतूक आणि चोरी केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे, कोणताही मोबदला न देता शासनाबरोबरच गरीब शेतकर्‍यांना चूना लावला जातो. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठिंब्यावर हा प्रकार सुरू आहे. त्वरित कारवाई न झाल्यास टेकडया भुईसपाट होतील त्याचबरोबर एैपत नसल्याने जमिनी पडीक पडल्या असा शेतकरी वर्ग देशोधडीला लागेल.

पोकलेनच्या सहाय्याने टिपरच्या मदतीने डोंगर टेकडी भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणेज मुरूमाचा उपसा होत असताना पर्यावरणाच्या नियमांची ऐसीतैशी करण्यात येत आहे. मुरूमाचा बेकायदेशीररीत्या उपसा करीत असताना ज्या शेतकर्‍यांच्या शेतातील टेकडया पोखरायचा आहे, त्यास अमिष दाखविण्याचे काम केले जात आहे, टेकडयांवर कोणतेही धान्य पिकत नसल्याने जमीन साफ करून देऊ एवढेच नव्हे तर, त्यात मातीचा भराव टाकून देऊ, असे आमिष दाखविले जात असल्यामुळे मुरूम माफियांच्या आमिषाला शेतकरीही बळी पडत आहेत.