Breaking News

अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई


कोपरगाव शहरातील धारणगावरोड येथे गुलशन होडे व योगेश कटारे {रा. कोपरगाव} यांनी अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत ६१ हजार रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला. 

पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त यांना कळविण्यात आले आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. थोरात, सहायक फौजदार जगधने, पोलीस नायक संदीप बोठे, पो. कॉ. अंबादास वाघ, संभाजी शिंदे, पदमकुमार जाधव यांनी भाग घेतला.