Breaking News

भिडेच्या अटकेसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कोरेगाव-भीमा दंगलीचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अजूनही अटक होत नाही. भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील गणेश पवार यांनी दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गणेश पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश पवार हा रीपब्लीकन सेनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.