Breaking News

भाजपकडून सुरेश धस विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार

बीड : बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव निश्‍चित झाले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर धस हे गुरुवारी धाराशिवमध्ये (उस्मानाबाद) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवड नाट्याच्या वेळेस आपल्या सदस्यांच्या माध्यमातून थेट भाजपला मदत करत जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणणारे माजी मंत्री सुरेश धस यांना बक्षीस म्हणून बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री सुरेश धस हे राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे निकटवृत्तीय म्हणून मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलाहाला कंटाळून सुरेश धस यांनी भाजपला जवळ केले.