Breaking News

प्रदूषणांच्या विळख्यात दिल्ली अव्वल जागतिक आरोग्य संघटनाच्या अहवालातून स्पष्ट

मुंबई : प्रदूषणाचा विळख्यात दिल्ली आणि मुंबईचा वरचा क्रमांक असल्याचे नुकत्याच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालात जगातील 20 शहरांची यादी प्रकाशित केली असून, त्यात भारतातील 14 शहरांचा समोवश आहे. या 14 शहरांत दिल्लीचा क्रमांक अव्वल असून, मुंबई चौथ्या स्थानावर आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या वषी मुंबई पाचव्या क्रमांकावर होती. पण आता शहरातील हवा प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. तर, याच चाचणीत दिल्ली क्रमांक एक म्हणजे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे म्हटले आहे. दिल्लीपाठोपाठ, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या 4 प्रदूषित शहरांची नावे आहेत. त्यामुळे, जगातील दर 10 माणसांपैकी 9 लोक प्रदूषित हवेने श्‍वासोच्छवास करत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. यामुळे दरवषी वायू प्रदूषणामुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहितीही या अहवालातून समोर आली आहे. तसेच वायू प्रदूषणामुळे हृदयासंबंधीच्या समस्या, श्‍वसन रोग यासरख्या समस्यांमध्येही वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.
2016 मधल्या प्रदूषण आकडेवारीवरून जागतिक आरोग्य संस्थेनं ही यादी तयार केली आहे. दिवसेंदिवस मानवाकडून पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. कितीही बंदी आणली तरी प्लॉस्टिकचा मोह काही कमी होईना आणि कचर्‍याची आता शहरं तयार होत आहेत. आपल्या या निष्काळजी आणि बेजबाबदार वागण्यामुळे या प्रदुषणाचा सर्वात मोठा फटका हा वन्यप्राणी, पशु-पक्ष्यांना होत आहे.