Breaking News

श्रीरामपुर येथे कौशल्य विकास रोजगार मेळावा उत्साहात



श्रीरामपुर : 
प्रगती व्हॉकेशन टेनिंग सेंटरचे काम उत्कृष्ठरित्या सुरू असुन याच पध्दतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र शिर्डी लोकसभा मतदार संघातील उर्वरित सहा तालुक्यातील गावात सुरु करावे, यासाठी मतदार संघाचे खासदार म्हणुन सर्वतोपरी सहकार्य करणार असे प्रतिपादन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले आहे. 


श्रीरामपुर येथील प्रगती व्हॉकेशनल ट्रेनिंग(पिएमटीएसएम) यांनी आयोजित केलेले कौशल्य विकास व रोजगार मेळावा तसेच प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपुर नगरपलिकेच्या कौशल्य विकास प्रशिक्षण विभाग प्रमुख स्वाती निरगुडे व समुह संघटक वर्षा पाठक, अशोक थोरे, राजेद्र देवकर, प्रा. सांगळे, प्रगती व्हॉकेशनल ट्रेनिंग सेंटरचे नंदकुमार धनवटे, प्रफुल्ल वावसे, सुनिल दराडे, रत्नमाला धनवटे, पुनम दराडे, राजश्री वावसे आदी उपस्थित होते.
 
खा. लोखंडे पुढे म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदार संघात इतर सहा तालुक्यांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केद्र सुरु करावे असे आवाहन करुन त्यासाठी लागणारे सर्व काही प्रकारची साधन सामग्री तसेच केद्र सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. छोटा-मोठा व्यवसाय सुरु करावा. प्रास्ताविकामध्येे संचालक नंदकुमार धनवटे यांनी प्रशिक्षणाबाबत विस्तृत माहिती दिली. 


केंद्राच्या प्रशिक्षक अलका नरोटे, हेमा क्षीरसागर, दिपाली तरकसे, शाहीन खान, स्वाती रणपिसे, सिमा आहेर, सायली पुजारी, प्रमिला बोरावके, मयुरी डुंगरवाल, शिल्पा बोरावके, मजुंश्री काळे, डॉ. माणिक गोसावी, कुलदिप चौधरी, सविता खंडागळे, लक्ष्मण थोरात, सविता त्रिभुवनसह आदी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन संजय जोगदंड यांनी तर, आभार प्रदर्शन प्रफुल्ल वावसे व सुनिल दराडे यांनी केले.