Breaking News

नागवडे कारखाण्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा सोमवारी अभिष्टचिंतन साहित्यीक डॉ.संजय कळमकर यांची उपस्थिती

श्रीगोंदा / प्रतिनिधी । 13 -  नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागवडे कारखान्यासह विविध संस्थांच्यावतीने श्रीगोंद्यातील तुळशिदास मंगल कार्यालयात त्यांचा अभिष्टचिंतन समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर व कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी दिली.

सोमवारी 14 मे रोजी सकाळी 9 वाजता येथील तुळशिदास मंगल कार्यालयात संपन्न होणार्‍या या अभिष्टचिंतन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यीक डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाचपुते असणार आहेत, तसेच राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागवडे कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी सकाळी 9 वाजता (दि. 15) रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व नागवडे कारखाण्याच्या संचालक मंडळाचे हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळा व रक्तदान शिबीर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मगर, नाईक, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष सोपान थिटे, श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षा अर्चना गोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी केले आहे.