इंटरनॅशनल ऑलिंपियाड स्पर्धेत स्टेला मारीस स्कुलचे यश
तालुक्यातील हंगा येथील स्टेला मारीस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल ऑलिंपियाड स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. नवी दिल्ली येथील सिल्वर झोन फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणार्या इंग्रजी व गणित विषयाच्या स्पर्धेत स्टेला मारीस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवत, ग्रामीण भागातील विद्यार्थीही कुठे कमी नसल्याचे दाखवून दिले. विद्यालयातील दुसरीत शिकणारी सायली सारंग कुलकर्णी हिने इंग्रजी विषयात शाळेतून प्रथम राज्यस्तरावर 99 वा तर ऑलांपियाड स्तरावर 713 वा क्रमांक पटकाविला आले. या स्पर्धेत इग्रंजी विषयात इयत्ता पहिलीतुन सई तुषार शिंदे, प्रिया शरद शिंदे, सिद्धी कैलास ढवळे, इयत्ता दुसरीतुन सायली सारंग कुलकर्णी, अक्षदा राजु शिंदे तर तिसरीतुन रविना हसराम देवासी, आर्यन चिंतामणी मांडगे, प्रिती देवराम मांडगे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तर गणित विषयात पहिलीमध्ये साई देवराम मांडगे, समृद्धी विवेक काळे, इश्म हनीफ शेख यांनी तर दुसरीत सायली सारंग कुलकर्णी व श्रावणी दत्तात्रय होले यांनी यश मिळविले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे स्कुलच्या मुख्याध्यापिका ग्रेस मारीया यांनी अभिनंदन केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे स्कुलच्या मुख्याध्यापिका ग्रेस मारीया यांनी अभिनंदन केले आहे.