Breaking News

सोबलेवाडीत अन्नदिन सोहळा उत्साहात


पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे अन्नदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दर महिन्याच्या 7 तारखेला अन्नदिन साजरा करणे आदेशित केले आहे. त्या अनुशंगाने अन्न दिनानिमित्त धान्य वाटपाचा कार्यक्रम काल रोजी सकाळी 10 वाजता सोबलेवाडीतील गिताराम म्हस्के ( पारनेर) यांचे स्वस्त धान्य दुकानात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांनी लाभार्थ्यांस अन्नदिन या योजनेविषयी माहिती दिली. यावेळी सोबलेवाडी येथील अन्नसुरक्षाचे पात्र लाभार्थी यांना तहसीलदार भारती सागरे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास तहसीलदार भारती सागरे, नायब तहसीलदार बाहुले रावसाहेब, पुरवठा अधिकारी कानडे, पुरवठा निरीक्षक पंकज जगदाळे, पारनेर नगरपंचायतच्या नगरसेविका वैशाली औटी, नगरसेविका विजेता सोबले, मंडल अधिकारी औटी, कामगार तलाठी मोरे, विलास सोबले, आनंदा औटी, माजी सरपंच बाळासाहेब शेरकर, लोणी हवेलीचे सरपंच डॉ़ शंकर कोल्हे, पांडुरंग औटी , बाळु बोरुडे, विकास म्हस्के, बापु सोबले, नारायण म्हस्के यांसह सर्व व्यवस्थापन समिती व परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. बहिरू म्हस्के यांनी सर्वांचे आभार मानले.