Breaking News

राजकीय आकसापोटी आरोप-प्रत्यारोपाने होणारी गावची बदनामी थांबवावी

तालुक्याच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे व संवेदनशील असलेली लिंपणगाव ग्रामपंचायतच्या राजकीय आकसापोटी होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाने गावची बदनामी सुरू असल्याने ती तात्काळ थांबविण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा एंटी करप्शन यूथ फोर्सचे अध्यक्ष भालचंद्र सावंत यांनी संघटनेच्या वतीने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रात केली आहे. लिंपणगाव हे सिद्धेश्‍वर व लिंगाळेश्‍वराची पावन भूमि आहे. लिंपणगावच्या सरपंचपदी दलित मागासवर्गीय महिला विराजमान असल्याने ही गावासाठी भूषनावह व कौतुकाची गोष्ट आहे. 

ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्याचा सर्वच सदस्य व ग्रामस्थ करत असताना गावातील काही मंडळी राजकीय स्वार्थ व आकसापोटी खोटे - नाटे आरोप करुन गावाची बदनामी समाजकंटक करीत आहेत. त्यांनी त्यांचे राजकरण आपल्या राजकरणाच्या पद्धतीने करावे. स्वतःच्या राजकारणासाठी गावाला बदनाम करु नये, अन्यथा एंटी करप्शन यूथ फोर्स व लिंपणगांव ग्रामस्थ यांच्या वतीने जनांदोलन करीत कायदेशीर मार्गाने बंदोबस्त केला जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सावंत यानी दिला आहे. ग्रामपंचयतीतील वाद ग्रामपंचायतितच मिटवावा यामध्ये गावास बदनाम करण्याचे कारण काय? कायदेशीर मार्गाने कारवाई व कामे मार्गी लावण्याचा अधिकार सरपंचास असताना, इतरांनी त्यात हस्तक्षेप करीत, कामात खोडा घालण्याचा प्रयत्न गैरसंवैधानिक असल्याचे सावंत यांनी नमूद केले आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशिरपणे शासनाचे निकष डावलून ग्रामपंचायतमार्फत अनाधिकृत कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करीत आहेत. त्यांच्या दबावास बळी न पड़ता बेकायदेशीर व अनाधिकृत कामे करण्यास सरपंचाने नकार दिल्याने, असे खोटे नाटे आरोप करीत आहेत. हे आरोप करत असताना, आपण आपल्या गावाची जिल्ह्यात आणि राज्यात बदनामी करीत आहेत. हे आरोप करणार्‍यांना लक्षात का आले नाही? की जाणून बुजून गावापेक्षा मीच मोठा कसा ते दाखविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? या निमित्ताने संविधानिक मार्गाने सरपंचपदी एक दलित मागसवर्गीय महिला सरपंच झाल्याने येथील काही विघ्नसंतोषी लोकांना दलित- संवर्ण वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कयास करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर 1 मे रोजी पुर्वनियोजित ग्रामसभा असताना काही सदस्यांनी खोडसाळपना करीत ग्रामसभा होऊ न देण्याच्या उद्देशाने अपप्रचार करीत ग्रामसभा रद्द झाल्याचेे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्यामुळे ग्रामसभेच्या कोरम पूर्ण होण्यास अडथळा निर्माण करुन सरपंच यांना खिण्डित पकडण्याचा प्रयत्न करुण सरपंच व गाव यांना काही चिमुटभर लोक वेठीस धरत आहेत. परंतु फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचे हे षडयंत्र हानून पाडण्याचा निर्धार सावंत यांनी केला आहे. यासाठी मोठा जनआंदोलनाचा रेटा उभा करुण समाज हितासाठी तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचे हे नियोजन करण्यात येणार असल्याचे भालचंद्र सावंत पत्रकात नमूद केले आहे.