Breaking News

आता सोलापूर स्थानकावर महिला आरपीएफ


सोलापूर, दि. 08, मे - गेल्या काही दिवसांपासून सोलापूर रेल्वे स्थानकावर महिला चोरांचे प्रमाण वाढले आहे. महिला प्रवाशांच्या गळ्यातले दागिने, पर्स आदींची चोरी करणारी महिला गँग पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे सोलापूर आरपीएफची डोकेदुखी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी महिला आरपीएफची नियुक्ती केली जाणार आहे. 

तसेच मुंबईहून विशेष कमांडो पथक देखील दाखल झाले आहे. सोलापूर विभागात एकही महिला आरपीएफ नसल्याने एखाद्या प्रसंगी महिला प्रवाशांशी संवाद साधणे पुरुष आरपीएफला अवघड जाते. सोलापूर विभागात एक ही महिला आरपीएफ नसल्याने अद्याप विभागात महिला विशेष रेल्वे स्थानक निवडता आले नाही. डीआरएम हितेंद्र मल्होत्रा व विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी मध्य रेल्वे मुख्यालयाला सोलापूर विभागासाठी महिला आरपीएफ नियुक्त करावे, असे लेखी कळविले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता मुंबईहूनच सूत्रे हलली आहेत. त्यामुळे सोलापूर स्थानकावर 5 महिला आरपीएफची नियुक्ती केली जाणार आहे. रविवारी सकाळी 5 महिला आरपीएफ व 10 कमांडो हे सोलापूर स्थानकावर दाखल झाले आहे. सोमवारपासून त्यांना सोलापूर स्थानकावर नियुक्त केले जाणार आहे.