Breaking News

विधान परिषद निवडणुकीतून दोघांची माघार


रत्नागिरी, दि. 08, मे - विधान परिषद कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सादर केलेले उमेदवारी अर्ज जैन किशोर ओटरमल आणि आदिती तटकरे यांनी आज मागे घेतले. त्यामुळे येत्या 21 मे रोजी होणार्‍या या निवडणुकीत अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि राजीव साबळे (शिवसेना) हे दोघेच उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यात थेट लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

दरम्यान, या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तीन जिल्ह्यांत मिळून एकूण 16 मतदान केंद्रांची यादी आज जाहीर केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ही केंद्रे आहेत. रायगड जिल्ह्यात 8 (पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड), रत्नागिरी जिल्ह्यात 5 (दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर), तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 (कणकवली, कु डाळ, सावंतवाडी) मतदान केंद्रांचा त्यात समावेश आहे.