Breaking News

शालेय मुलींसाठी मोफत मिक्स्ड मार्शल आर्ट


सोलापूर, दि. 08, मे - समाजात वावरत असताना मुलींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. काही वेळेला अतिप्रसंगासारखे प्रकारही घडताना दिसतात. असा प्रकारांना मुलींनी धैर्याने सामोरे जाऊन लढा द्यावा, पुरुषांशी दोन हात करावे, स्वत:चे रक्षण स्वत:ला करता यावे यासाठी पाचवी ते दहावीच्या मुलींना मोफत मिक्स्ड मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्र शिक्षणासाठी शाळांनी सहभाग नोंदवावा. त्यानुसार शाळेमध्ये जाऊन मुलींना प्रात्यक्षिके करून दाखविली जातील. 

कर्णिकनगर येथील नव्याने सुरुवात झालेल्या क्रॉस फिट अनबिटेबल जीमच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहे. यासाठी शाळांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. सध्या मुलीमध्येही लठ्ठपणा ही समस्या बनत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात मार्शल आर्ट व फिटनेसबरोबर स्वरक्षण हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक तासाच्या प्रशिक्षणामध्ये कराटे, बॉक्सिंग, मिक्स्ड मार्शल आर्ट आणि ज्युडो आदीचे प्रशिक्षण दिले जाईल. कार्डिओ किकबरोबर योगादेखील शिकविला जाईल.