पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
अरनिया- जम्मू काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका 70 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. याच भागात पाकिस्तातने सोमवारी गोळीबार केला होता. अरनियामधल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. इतर स्थानिक लोकांनी अरनियामधल्या नागरिकांसाठी अन्नधान्याची सोय केली आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या गोळीबारात विशेष पोलीस अधिकारी तसेच एका महिलेसह पाच नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने सीमा सुरक्षा जवानांशी फोनद्वारे संपर्क साधून परिसरात शांतता कायम ठेवण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा गोळीबार झाला. रमजानच्या पवित्र महिन्यात केंद्र सरकारने दहशतवाद्याविरोधी कारवाईस स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.