Breaking News

हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून 30 प्रवासी ठार

शिमला, दि. 20, जुलै - हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील रामपूरजवळ एक बस दरीत कोसळून यात 30 प्रवासी ठार तर 17 जण गंभीररित्या जखमी झाले  असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 60 प्रवासी होते. ही बस किन्नोर येथून सोलनला जात होती. स्थानिक पोलीस आणि  रूग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी रूग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केले.