Breaking News

दखल - पंतप्रधानपदाचाही अवमान

देशात आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले, त्या सर्वांनी पदाची प्रतिष्ठा राखली. पंतप्रधान हा एका पक्षाचा नेता नसतो, तर तो देशाचा नेता असतो. या पदाला प्रतिष्ठा असते. तसेच क ाही मर्यादा असतात. उच्चपदस्थ व्यक्तीनं या मर्यादांचं पालन करायला हवं. बोलताना तोंडाला येईल, ते बोलू नये. बाहेरच्या देशांत गेल्यानंतर देशाबाबत बोलावं. सरकार करीत असलेल्या कामाचा आढावा घ्यावा. देश कसा बदलतो आहे, हे अवश्य सांगावं; परंतु पक्षीय राजकारणाची धुणी धुवू नयेत. तसा संकेत आहे. 


नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी पंतप्रधान झालेल्या सर्वंच पंतप्रधानांनी हे बंधन पाळलं. निवडणुकीच्या मैदानात विरोधी पक्षांवर टीका केली; परंतु ही टीका करतानाही मर्यादाचं पालन केलं. पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचं असतं. त्याची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत. लोकांना खिळवून ठेवण्याचं कौशल्य त्यांंच्याकडं आहे. परंतु, त्यांचं प्रत्येक भाषण म्हणजे निवडणुकीतल्या प्रचारासारखं असतं. जागतिक व्यासपीठांचा वापर ही ते राजकीय धुणी धुण्यासाठी करतात. जर्मनी, मंगोलियासारख्या देशात त्यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली. भ्रष्टाचारी देश अशी भारताची प्रतिमा होती, असंल्याचं चित्र त्यांनी रंगविलं. त्यात औचित्यभंग होता. माध्यमांनी त्याविरोधात लिहिलं. परंतु, मोदी यांनी त्यातून काहीच बोध घेतला नाही. उलट, त्यांनी परदेशातील पुढच्या अन्य दौर्‍यातही टीका सुरूच ठेवली. विरोधी पक्षांवर टीका करतानाही काही मर्यादा पाळल्या, तर पंतप्रधानपदाचीही प्र तिष्ठा राखली जाते. मोदी यांनी मात्र आता स्वतः च प्रतिष्ठा घालवायचं छरविलेलं दिसतं. त्यामुळं एरव्ही संयमी असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्यांना आक्रमक होत मोदी यांना जबाबदारीची आणि पदाची जाणीव करून द्यावी लागते.


मोदी यांच्यापूर्वीच्या पंतप्रधानांंनी जी मर्यादा पाळली, प्रतिष्ठा राखली, ती आता मोदी धुळीस मिळवायला निघाले आहेत. पंतप्रधान ही निवडणूक जिंकूून देणारी इव्हेंट मॅनेजमेंटची संस्था नाही, याचं भान ठेवायला हवं. परंतु, मोदी यांना ते नाही. मोदी एका एका अगणित सभा घेऊन पंतप्रधानपदाचं अवमूल्यन करीत आहेत. भक्तांच्या हे आताच लक्षात येणार नाही. परंतु, जेव्हा एखादी लाट ओसरते, तेव्हा त्याचे परिणाम भयावह असतात. जनतेची स्मरणशक्ती कमी असते, असं समजून आपण काहीही बोलत गेलं, तरी चालेल असा ग्रह करून ते बोलत असतील, तर त्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आताही कर्नाटकच्या निवडणुकीत मोदी यांनी असाच मर्यादाभंग केला आहे. त्याअगोदर गुजरातच्या निवडणुकीत मनमोहन सिंग व अन्य नेत्यांवर पाकिस्तानधार्जिणे असल्याचं ठरविण्यासाठी कांगावा केला होता. नंतर मात्र ते निवडणुकीचं भाषण असल्याचं सांगत जबाबदारी घ्यायचं टाळलं. काँग्रेसनं किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशा शब्दांमध्ये मोदी यांनी रविवारी कर्नाटकच्या जामखंडी येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर कर्नाटकात आढळणार्‍या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसनं देशभक्ती शिकावी, असा सल्ला मोदी यांनी दिला. ज्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, गोळ्या खाल्लया. देशासाठी कोट्यवधींची संपत्ती दान केली, त्या पक्षाच्या नेत्यांवर स्वातंत्र्यचळवळीपासून दूर राहणार्‍या पक्षाच्या नेत्याला टीका करण्याचा अधिकार नाही. देशभक्ती भाजपकडून शिक ण्याइतकी वाईट वेळ काँग्रेसवर अजून नक्कीच आली नाही. मुधोल कुत्रे म्हणजे शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. भारतीय लष्करामध्ये सामील होणारी मुधोल ही भारतीय कुत्र्यांची पहिली प्रजाती आहे. त्यांचं कौतुक करायलाही हरकत नाही. परंतु, त्यासाठी काँग्रेसला सल्ला देण्याची आवश्यकता नव्हती. आपण कशाची तुलना कशाशी करतो आहोत, याचं भान नाही राहिलं, की काय होतं, हे मोदी यांना आता नाही, तरी नंतर कळेल.


ज्यांना देशभक्तीच्या नावानं त्रास होतो, देशभक्तीच्या चचेर्र्विरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, अशा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला दुसर्‍याकडून शिक ायचं नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला मोदी यांनी दिला. ज्या संघ प रिवारात मोदी यांची जडणघडण झाली, त्यांच्या शाखेत पूर्वी देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होत नव्हता. त्यांनी इतरांना देशभक्ती शिकवावी, हे अतीच झालं. खोटं बोल. परंतु, रेटून बोल, अशी त्यांची वृत्ती आहे. त्यातून तर त्यांनी राहुल, डॉ. सिंग यांच्याबाबत अविश्‍वासाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. जेएनयूप्रकरणात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. कन्हैयाकुमारची सुटका झाली, तरी त्याचां संदर्भ देऊन राहुल यांच्या देशभक्तीविरोधात जाणीवपूर्वक संशय निर्माण करण्याचं काम मोदी करीत आहेत. ज्यानं आपली आजी, वडील देशासाठी दिले, त्याला वेगळी देशभक्ती शिकवण्याची गरजच नाही. सध्या दोन हजार रुपयांच्या सात लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात आहेत. आजपर्यंत आपल्या देशातील कोणत्याही पंतप्रधानानं पंतप्रधान कार्यालयाचा वापर करत विरोधकांवर टीका केलेली नाही. पण, नरेंद्र मोदी हे रोज करत आहेत. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणं शोभत नाही आणि ही देशासाठी चांगली गोष्ट नाही अशी टीका डॉ. सिंग यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक ीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरलं. मोदी सरकारचं आर्थिक व्यवस्थापन सर्वसामान्य लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्‍वास हळूहळू कमी करत आहे. काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांमध्ये निर्माण झालेला चलनतुटवडा नक्कीच रोखता येणं शक्य होतं असं, डॉ. सिंग यांनी म्हटलं आहे.


जीएसटीची अंमलबजावणी आणि नोटाबंदी ही मोदी सरकारची दोन मोठी आश्‍चर्य आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेच प्रचंड मोठं नुकसान झालं, ज्याचा फटका छोट्या आणि मध्यम उद्योजकांना बसला आणि हजारो नोकर्‍याही गेल्या, असं त्यांनी निदर्शनास आणलं. पंतप्रधान मोदी दावोसमध्ये नीरव मोदीच्या सोबत होते. त्यानंतर काही दिवसातच त्यानं पळ क ाढला. यावरुनच हे सरकार किती निष्क्रिय आणि अजब आहे, हे समजू शकतं असा टोला डॉ. सिंग यांनी मारला. कार्यक्रमावर बोलण्याऐवजी खोट्यानाट्या गोष्टीचा आधार जेव्हा घ्यावा लागतो, तेव्हा आपली सर्व अस्त्र निष्प्रभ ठरली आहेत, असं मानायला हरकत नाही, हे मोदी यांनी आता समजून घ्यायला हवं.