Breaking News

लोकशाहीचे मंदीर मंत्रालयाच्या वास्तूत पारदर्शक कारभाराचा पाडला मुडदा

मुंबई/विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या मंत्रालय इमारतीतून तब्बल 897 ट्रक्स डेब्रीज उकरण्याचे धाडस दाखवून सहीसलामत अधिक्षक अ भियंता पदाची बढती पदरात पाडून घेणारे रणजीत हांडे सार्वजनिक बांधकाम विभागात चर्चेचा विषय ठरले आहेत तर दुसरीकडे गृहमंत्रालयाच्या डोळ्यात त्याच डेब्रीजचा धुराळा फेकू न इतक्या मोठ्या संख्येने डेब्रीज भरलेल्या ट्रक्स मंत्रालयाबाहेर काढण्यात यशस्वी होत. तब्बल 34 लाखाच्या शासकीय निधीचा अपहार करणारे रणजीत हांडे चौकशीच्या फेर्यात कु ठेही दिसत नाहीत यावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आठ महिन्यांच्या कारकिर्दीत रणजीत हांडे यांनी तब्बल दहा टेंडर काढले, सात वर्क आर्डर केल्या म्हणून प्रज्ञाताई वाळके यांनी देयके मंजूर केली त्यांना निलंबीत केले आणि रणजीत हांडे अधिक्षक अभियंता म्हणून अद्याप सेवेत आहेत, त्यांची चौकशी का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रणजीत हांडे यांनी दि.23 मार्च 2015 रोजी शहर इलाखा शाखेचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आणि मंत्रालय इमारस्तीच्या दुरूस्तीचे टेंडर प्रस्तावित केले. या टें डरमध्ये नवीन काम करण्यासाठी इमारतीचे डेब्रीज काढण्याच्या टेंडरचा समावेश केला. कुठलेही काम करतांना वास्तवतेचे भान ठेवले गेले नाही तर अनेक चुका होतात. रणजीत हांडे यांनीही हे भान न ठेवल्याने शासनाच्या डोळ्यात धुळ फेकण्याची चुक सहज केली. या काळात मंत्रालय इमारतीचे 897 डेब्रीज बाहेर काढण्याचा पराक्रम रणजीत हांडे यांच्या हातून जाणीवपुर्वक घडला आहे. ही बाब जेंव्हा उघड झाली तेव्हा अनेक प्रश्‍न निर्माण होऊन रणजीत हांडे यांच्या कार्यप्रणाली संशयाच्या भोवर्‍यात सापडली. जवळपास नऊशे ट्रक्स डेब्रीज काढले पण ते साठविण्यासाठी मंत्रालयात एवढी मोठी जागा कुठे उपलब्ध आहे. मोजमाप पुस्तिकेत दाखवलेल्या नोंदी आणि प्रत्यक्षात एवढे डेब्रीज वाहून नेण्यासाठी वापरल्या गेलेल्या ट्रक्स मंत्रालयात कुठे कधी कशा उभ्या केल्या असतील? डेब्रीज काढण्यासाठी वापरलेले मजूर आणि ट्रक यांना मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेशासाठी आवश्यक असलेले प्रवेश पास गृहमंत्रालयाने दिले होते का? सारेच अनाकलनिय असून एवढ्या प्रचंड संख्येत ट्रक्स मंत्रालयात येण्याची ही पहीलीच वेळ असल्याने रणजीत हांडे यांच्या कतर्त्वाची इतिहासात नोंद झाली आहे.
मंत्रालय महाराष्ट्राची अस्मिता आहे. जनतेला या इमारतीविषयी नितांत आदर आहे. महाराष्ट्राची भाग्यविधाता असलेली ही वास्तू असल्याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभार करण्याचा पायंडा याच वास्तुतून सुरू केला, लोकशाहीचे मंदीर असलेल्या या वास्तूत रणजीत हांडे यांनी मात्र मुख्यमंत्र्याच्या पारदर्शक विश्‍वासाचा मुडदा पाडला, अशी भावना सार्वजनिक बांधकाम विभागात व्यक्त केली जात आहे (क्रमशः). 


उद्याच्या अंकातः
मंत्रालयातील कथीत डेब्रीजचे टेंडर करणारे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांची चौकशी का होत नाही?
चार क्युबीक मिटर लोड वाहून नेणार्‍या ट्रकमध्ये रणजीत हांडे यांनी 6 क्युबीक मीटर डेब्रीजचा लोड कसा भरला? ओव्हरलोडचा हिशेब कसा करणार?
मंत्रालयात 897 ट्रक्स डेब्रीज कसे निघाले?
शहर इलाखा साबां विभागाच्या विद्यमान अहवालात 540 ट्रक्स डेब्रीजची नोंद दाखवली जात असताना रणजीत हांडे यांनी 897 ट्रक्सचे टेंडर करून 357 ट्रक्स डेब्रीज कसे वाढ विले? या मागचे अर्थकारण काय?