खुशाल न्यायालयात जा ; मात्र आरोप करू नका : हावरे
शिर्डी/प्रतिनिधी - साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईभक्त आणि शिर्डी शहराच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत. जे काही निर्णय विश्वस्त मंडळाने घेतलेले आहेत, ते नियमावलीनुसारच घेतले आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयावर कोणाचा आक्षेप असेल तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे. मात्र आमच्यावर खोटोनाटे आरोप करू नयेत, असे आवाहन साईसंस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.
श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत विश्वस्त मंडळ विकासकामे करीत नसल्याचा आरोप शिर्डी ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी साईसंस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाला टिकेचे लक्ष करून विश्वस्त मंडळाच्या आगामी बैठकीच्या वेळी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात डॉ. हावरे यांनी म्हटले आहे, संस्थानचा कारभार स्विकारल्यापासून सामान्य साईभक्तांना समोर ठेवून अनेक निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांचा शिर्डीत आलेला भाविक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. विश्वस्त मंडळावर केलेले आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत. व्यक्तीगत पातळीवर जाऊन हीनदर्जाचे आरोप करणे सभ्य माणसांना शोभत नाही. आमच्यावर केलेल्या व्यक्तीगत आरोपांची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. विश्वस्त मंडळाने वर्षपूर्तीची जी पुस्तिका प्रसिध्द केली आहे, त्या पुस्तिकेत जी कामे केली आहेत आणि जी कामे करणार आहोत, त्याचीच माहिती आहे. त्यात कोणतीही चुकीची माहीती नाही. आजवर मुख्यमंत्री महोदयांनी शिर्डीच्या विकासासंबधी जी कामे सांगितली, ती सर्व कामे मार्गी लावलेली आहेत. असे असताना केवळ व्यक्तीगत स्वार्थापोटी हितसंबध दुखावले असल्यास त्याला विश्वस्त समंडळाला जबाबदार धरू नये. साईभक्त व शिर्डीच्या विकासासाठी विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे. विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाला शिर्डीच्या नगराध्यक्षा साक्षीदार आहेत. आम्ही शिर्डीसाठी जे काही निर्णय घेतले आहेत, याचा योग्य तो खुलासा नगराध्यक्षांनी व नगरपंचायतीनेच करावा. विश्वस्त मंडळ कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.
विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जो निधी दिला, तो नियमावलीला धरूनच दिला आहे. त्यात गैर काहीही नाही. आमच्यावर खोटोनाटे आरोप करून साईभक्त व जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आम्ही घेतलेल्या निर्णयावर काही आक्षेप असतील तर न्यायालयात जावे. त्यांना न्यायालयाचा मार्ग खुला दरवाजा उघडा आहे, असेही डॉ. सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले.