महाराष्ट्र राज्य नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बापूसाहेब वैद्य यांची फेरनिवड
राहाता : महाराष्ट्र राज्य नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब वैद्य यांची फेरनिवड झाली आहे. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. सुधिर पिसे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. याबैठकीत जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. समाजातील बेरोजगार युवक व आर्थिक दुर्बल कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून समाजबांधवांचे अधिक भक्कम संघटन उभे केले जाणार आहे. यातून समाजातील विद्यार्थ्यांना भरीव आर्थिक मदत करणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.