वाहतुकीच्या सद्यस्थितीची माहिती एका क्लीकवर मिळणार
पुणे - शहरात एखाद्या ठिकाणी जायचंय मात्र, उशीर झाला आहे आणि रस्त्यांवर कोठे ट्रॉफीक आहे ? कोठे महापालिकेच्या खोदाईचे काम सुरू आहे ? कोणता रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. याची माहिती आता पुणेकरांना एका क्लीवर आणि रस्त्यावरून वाहन चालवितानाही मिळणार आहे. स्मार्ट सिटीकडून शहरभर उभारण्यात आलेल्या डीजीटल डिस्प्ले बोर्डांवर 15 मे पासून शहरातील वाहतूकीच्या सद्यस्थितीची माहिती झळकणार आहे.
त्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड (पीएससीडीसीएल) आणि टॉमटॉम या नेव्हीगेशन क्षेत्रातील कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत स्मार्ट सिटी कंपनीच्या वाहतुक व्यवस्थापन अंतर्गत ‘लाइव्ह ट्रॅफिक रिअल टाईम अपडेट इन्फॉर्मेशन’ ही सेवा पुणेकरांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली वाहतुक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, टॉमटॉम कंपनीच्या भारताच्या सरव्यवस्थापक बार्बरा बेलपेयर यावेळी उपस्थित होत्या.