Breaking News

नागरिकांसाठी अहिल्या मोफत आरोग्य हेल्पलाईन

पुणे - नागरिकांना शासनाकडून पुरविल्या जाणार्‍या आरोग्य सेवांची फारशी माहिती नसते त्यामुळेच काही डॉक्टरांनी एकत्र येत अहिल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील नागरिकांना स्वस्तात उपचार कोठे होतील, महात्मा फुले जन आरोग्य योजना अथवा धर्मादाय रुग्णालये कोठे आहेत, स्वस्त औषधे कोठे मिळतील, वैद्यकिय निधीसाठी कसा अर्ज करावा, डॉक्टरांचा मोफत सल्ला आदी माहिती एका हेल्पलाईनद्वारे मिळणार आहे.


पुण्यातील दहा डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून ही संकल्पना मांडली आहे. पुणे जिल्हा व महाराष्ट्रातील जनतेसाठी अहिल्या आरोग्य हेल्पलाईन आजपासून सुरू झाली आहे. या हेल्पलाईनचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित राहणार असल्याची माहिती हेल्पलाईनचे समन्वयक डॉ. रोहित बोरकर यांनी दिली.