Breaking News

वरातीला फाटा देत शिवविचारांचा जागर! हुलावळे कुटुंबाचा पुढाकार

पारनेर | प्रतिनिधी - लग्न सभारंभ म्हटले की आनंदीआनंद उत्साह, डिजेचा निनाद, मद्य प्राशन केलेल्या अवस्थेतली तरुणाई असे चित्र नेहमी पाहायला मिळते. परंतु या सर्व प्रकरांना ना छेद देत पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील हुलावळे कुटुंबाने शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करून एक आदर्श पायंडा घातला.

लग्नात मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च केला जातो. रात्री वरातीमध्ये कर्णकर्कश आवाजतला डीजे, त्यासमोर बेफान होऊन नाचणारी तरूणाई हे हल्ली सर्रास पहावयास मिळते. मात्र खडकवाडी येथील सुरेश हुलावळे यांचे चिरंजीव सोमनाथ यांचा विवाह राहुरी तालुक्यातील बाळासाहेब कोबरणे यांची स्वप्नाली हिच्याशी संपन्न झाला. याच रात्री डिजेच्या तालावर वरात न करता हुलावळे यांनी राहुरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे ‘शिवकालीन महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी हसन सय्यद म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा मानसन्मान होत होता. परंतु आज दिवसाढ़वळ्या महिलांची इज्जत लुटली जात आहे. यावेळी बाळासाहेब हुलावळे, विष्णु हुलावळे, भास्कर हुलावळे, सौरभ घोलप आदी उपस्थित होते. प्रास्तविक श्रीकांत जाधव यांनी केले.