‘प्रवरा’त बुडून धांदरफळच्या तरुणाचा मृत्यू वाळू उपशाचा आणखी एक बळी
संगमनेर/प्रतिनिधी। तालुक्यातील धांदरफळ येथील प्रवरा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल {दि. १३ } दुपारी घडली. संजय सुदाम खताळ { रा. धांदरफळ खुर्द} असे मयत तरुणाचे नाव आहे. दुपारी दोनच्या सुमारास मित्रांसोबत तो प्रवरा नदीत पोहायला गेला असता नदीकाठी पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे ही घटना घडली.
मित्रांनी त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु नदीपात्रात ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे त्याचा ठाव लागला नाही. यानंतर गावकऱ्यांनी मिळून नदीपात्रात सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. दरम्यान, आज {दि. १४ } सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संजयचा मृतदेह आढळला. योग्य त्या प्रक्रियेनंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.