रुईछत्रपती येथे मोराचा मृत्यू, एका महिन्यात चौथी घटना, वनविभागाचे दुर्लक्ष
पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती येथिल टेंभी तलावाजवळ असणार्या भवानी माता परिसरात शनिवारी एक मोर मृत अवस्थेत आढळला. हा मोर उच्च दाबाची विजेची वाहतूक करणार्या टावर भोवती आढळून आला असल्याने विजेच्या धक्याने मृत पावला असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला. एका महिन्यातील ही चौथी घटना असतांनाही वनविभाग मात्र याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अण्णा दिवटे, प्रकाश दिवटे यांनी केला आहे.
रूईछत्रपती येथिल टेंभी तलावालगत असलेल्या भवानी माता परिसरात सुमारे 150 मोरांचे वास्तव्य आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र मागील महिन्यातील ही चौथी घटना घडल्याने मोरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने मोरांचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याचे वन्यप्रेमी सोनबा दिवटे, प्रशांत दिवटे, गणेश दिवटे, राहुल दिवटे यांनी सांगितले.
दरम्यान टेंभी तलावालगत मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे असल्याने या ठिकाणी मोर, ससे, लांढोर, बगळे यांसह अनेक पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अल्प प्रमाणात पाऊस झाल्यास तेथील ग्रामस्थ मोरांना धान्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात, मात्र त्यांच्या डोळ्यासमोर एक- एक मोर मृत्यूमुखी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.