शहरातील मार्गांवर चक्का जाम
लग्न सराईचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यावरील कापड बाजारासह रस्त्यावरील रहदारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नांच्या तिथी असल्याने सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर लग्नांसाठी जात असलेले वर्हाडाची वाहने, तळपत्या उन्हामध्ये भरधाव वेगाने लग्नासाठी जाणारे तरूण अधिक प्रमाणात रस्त्यावर दिसून येत आहेत. यामळे रहदारीमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. याचेच पर्यावसान चक्का जाम होण्यामध्ये होत आहे. तासन् तास शहरामध्ये चक्का जाम होत आहे. त्यातच शहरातील चौकांमध्ये बंद अवस्थेत असलेले ट्रॅफिक सिग्नल शहरातील वाहतूक कोंडीस चांगलाच हातभार लावत आहेत. त्यातच दुचाकी चालकांची वाहने चालविण्याची पद्धतीमुळेदेखील वाहतूक कोंडी होण्यास मदत मिळत आहे.