Breaking News

अंगणवाड्याना गॅस संच प्रदान


शिर्डी / प्रतिनिधी - साकुरी येथील ६ अंगणवाड्यांसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने ६ गॅस संच शेगडी प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सरपंच राजेंद्र दंडवते, उपसरपंच सचिन बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश लुटे, शकुंतला लुटे, स्वप्नील बावके, अंकुश भडांगे, ग्रामसेवक रामदास डुबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सरपंच राजेंद्र दंडवते म्हणाले, साकुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. प्रभाग क्र. ४ व ५ मध्ये रस्त्याचे काँकिटीकरण काम मार्गी लागले आहे. अंगणवाडी सेविकांसाठी गॅस संचची मोठी अडचण होती. ती आता दूर झाली आहे. अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना चांगला आहार व चांगले शिक्षण देऊन येणाऱ्या भावी पिढीवर चांगले संस्कार हे खऱ्या अर्थाने अंगणवाडीपासूनच होत असतात. यावेळी ग्रामस्थ आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ग्रामविकास अधिकारी रामदास डुबे यांनी आभार मानले.