Breaking News

धोकादायक इमारतींची दाखल घ्या : मागणी


कोपरगाव: शहर प्रतिनिधी: शहरात गोदाम गल्ली, मार्केट यार्ड, गिरमेचाळ व इतर प्रभागात जुन्या इमारती लाकडाच्या आधारावर उभ्या आहेत. पावसाने भिजून त्या कधीही कोसळू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेवुन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. 

मान्सून अंदमानात दाखल झाला असला तरी महाराष्ट्रातील शेतकरी व उद्योजक पाण्यासाठी आस लावून बसले आहेत. मात्र अशा परिस्थितीत राज्य शासनाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. पावसाळ्यापूर्वी शहरात निरीक्षण् करून उंच वाढलेली, कुजलेली व विद्युत् वाहक तारांना अडथळा करणाऱ्या झाडांची छाटणी केली पाहिजे. तसेच शहरातील जुन्या पडक्या धोकादायक इमारतींचा सर्वे करून् संबंधित मालकाला नोटीसा बजावुन त्या इमारती पाडल्या पाहिजेत. परंतु शहरात आजपर्यंत असे झाले नाही. दोन दिवसांपूर्वी शहरात गजबजलेल्या गांधी चौकातील नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्पलेक्सजवळ असलेल्या औदुंबराच्या झाडाची फांदी अचानक तुटुन पडली. त्यामुळे त्या झाडाजवळ लावलेल्या दुचाकींचे नुकसान झाले. तेथे असलेल्या नागरिकांना सुदैवाने इजा झाली नाही.