Breaking News

कलाकारांच्या सुविधांची जबाबदारी महानगरपालिकेची - मुक्ता टिळक

पुणे, दि. 17, मे- पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराने अनेक गुणवंत कलाकार देशाला दिले आहेत. सांस्कृतिक विषयावर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात क ाम करण्याची इच्छा आहे. मात्र न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार आमचे हात बांधले गेले आहेत. आगामी काळात सर्व कलाकारांच्या सुविधा आणि शहरातील रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिकेचीच असेल, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन आर्टस् आणि अलाईड आर्टस् शाखेतर्फे बांलगर्धव रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित चित्र प्रदर्शन ’’कारी 2018’’ च्या उद्घाटन कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. 

कारी 2018 हे चित्र प्रदर्शन नागरिकांसाठी 10 ते 12 मे दरम्यान खुले करण्यात आले. तसेच फाईन आर्टस् विद्यार्थी उत्तम जनवाडे यांनी काढलेल्या उत्कृष्ठ चित्राचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुण्या सारख्या सांस्कृतिक भूमितून अनेक कलाकार घडले आहेत. या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगरपालिका सदैव पाठीशी उभी राहिली आहे. त्यांच्यासाठी अनेक कला पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहन देत राहिली आहे. मात्र, याविरोधात काही आरटीआय कार्यकार्त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. परिणामी न्यायालयाने आमच्यावर बंधने लादली. महानगरपालिकेला कलाकार आणि शहरातील रंगमंदिराच्या उभारणीसह देखभाल दुरुस्तीसाठी खूप काही करण्याची इच्छा असून काहीच करता येत नाही. राज्य सरकार सोबत चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात महानगरपालिका गुणवंत कलाकारांच्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे उभी राहील, असा विश्‍वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.