Breaking News

वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी मंत्र्यांकडून अनेक अपेक्षा

सोलापूर, दि. 17, मे - शफी इनामदार यांनी सुरू केलेले भारत गारमेंट बंद झाले. लोकांचा रोजगार गेला. अशा स्थितीत वस्त्रोद्योगमंत्र्यांची जबाबदारी अधिक वाढते. उद्योगाच्या वाढीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार विजयसिंह मोहिते यांनी येथे व्यक्त केली. राजमुद्रा लाइफस्टाइल या नव्या दालनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सकाळी झाले. त्यानंतर ते बोलत होते. राजेंद्र हजारे या खेड्यातून आलेल्या माणसाने शहरात येऊन व्यवसाय करावा, ही मोठी बाब असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. 

पालकमंत्री देशमुख म्हणाले, स्मार्ट सोलापूर म्हणून विकसित होणार्‍या या शहराच्या वैभवात हजारे यांनी भर घातली. नागरिकांच्या सहभागाशिवाय शहर स्मार्ट होणार नाही. या नव्या दालनात साड्यांपासून नावीन्यपूर्ण शर्टस्, ट्राऊझर्स, लेडीज वेअर, ड्रेस मटेरियल, किड्स वेअर आदी असल्याचे हजारे यांनी सांगितले.