Breaking News

मोबाईलवर बोलणारा चालक दाखवून बक्षीस मिळवण्याचे आवाहन

पुणे, दि. 17, मे- ड्रायव्हिंग करत असताना चालकांच्या मोबाईल वापराला आळा बसावा यासाठी पीएमपी प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. पीएमपी प्रशासनाने नागरिकांना ’मोबाईलवर बोलणारा चालक दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे आवाहन केले आहे. मोबाईलवर बोलणा-या चालकाचा फोटो काढून ीों वेबसाईटवर पाठवल्यानंतर शहानिशा करून संबंधिताला 1 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

बस चालवित असताना चालक मोबाईलचा वापर करताना तपासणी पथकास अथवा प्रवाशी नागरिकास आढळल्यास त्या चालकाकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यातील एक हजार रुपये तक्रार करणा-या नागरिकास तर उर्वरीत एक हजार रुपये पीएमपीच्या कामगार कल्याण यजनेत वर्ग करण्यात येणार आहेत. एका नागरिकाला एका महिन्यात तीनच तक्रारी करता येणार आहेत. त्यानंतरही एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यास त्याला बक्षिसाची रक्कम मिळणार नसून ती पीएमपीच्या कामगार कल्याण निधीत जमा करण्यात येणार आहे.