छत्रपती शिवाजी विद्यालयाचा बारावीचा उत्कृष्ट निकाल राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर ९९. ३९ टक्के
कोपरगाव ता. प्रतिनिधी
तालुक्यातील कोळपेवाडी येथील छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाने व राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराने याहीवर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. श्री. छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ९५. १० एवढा लागला. विज्ञान विभागाचा शंभर टक्के, वाणिज्य विभाग- ९८. ७९ %, कला शाखा – ७८ %, किमान कौशल्य शाखा – ८९. १८% आणि राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराचा शेकडा निकाल ९९. ३९ टक्के एवढा लागला. तर विज्ञान शाखा – १००%, कला शाखा – ९८.६३ एवढा लागला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य एन. ए. मते आणि प्रभारी प्राचार्य एस. जे. गायकवाड यांनी दिली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा चैताली काळे यांनी अभिनंदन केले.