Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांनी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा


प्रवरानगर प्रतिनिधी

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध १८ उच्च माध्यमिक विद्यालयामधून परिक्षेसाठी बसलेल्या २ हजार ८२२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५५२ विदयार्थी उत्कृष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल लोणी विज्ञान शाखा, प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर विज्ञान शाखा, भगवतीमाता विद्यामंदिर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, भगवतीपूर वाणिज्य शाखा, प्रवरा माध्यमिक विद्यालय, वरवंडी विज्ञान शाखा आणि कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सात्रळ या कनिष्ठ महाविद्यालयांचा कला आणि वाणिज्य शाखांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.

या विद्यार्थ्यांचे राज्याचे विरोधी पक्ष नेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, सेंट्रल पब्लिक स्कूलचे डायरेक्टर कर्नल डॉ. भारत कुमार सिंग आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.