Breaking News

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज ; क्रांतीसेनेने केला निषेध


राहुरी विशेष प्रतिनिधी

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात कांदा बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांवर अमानुष लाठीमार झाला. या प्रकारचा क्रांती सेनेच्यावतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दि. २८ रोजी विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरू केली होती. यासाठी विद्यापीठाने ७ ठिकाणी विक्री केंद्र उभारले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांमध्ये बियाणे खरेदी करताना गोंधळ उडाला. या दरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून स्वत:च्या चुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये बियाणे खरेदीवेळी गोंधळ करणारया शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे काही शेतकऱ्यांना दुःखापत होऊन ते जखमी झाले. लाठीचार्ज करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, राहूरी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारदे, आरपीआय नेते बाळासाहेब जाधव, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, राजू बेल्हेकर, सचिन गावडे, बापू दळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.