Breaking News

राज्यभरात अठ्ठावीस लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी

मुंबई, : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. काल दि. ७ मे पर्यत १९२ तूर केंद्रांवर दोन लाख ३० हजार ३४८ शेतकऱ्यांची २८ लाख ८८ हजार ९१८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. तूर खरेदीला मुदतवाढ दिली असून आता १५ मेपर्यंत तूर खरेदी होणार आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रा शिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.