Breaking News

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष शिबीर

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 42 मधील तरतुदीनुसार अर्ज केलेल्या अर्जदारांना सनद देण्यासाठी बुधवार दि. 9 मे रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 42 मधील तरतुदीनुसार ज्या जमीन मालकांनी, विकासकांनी, सह-हिस्सेदारांनी सनद मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज केले आहेत. परंतु, अद्यापपर्यंत ज्यांना सनद निर्गमित झालेली नाही अशा सर्व संबंधितांना सनद देण्यात येणार आहे.मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवार, दिनांक 9 मे रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी संबंधितांनी स्वत: बुधवार दि. 9 मे रोजी शासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा (पूर्व), मुबई येथे सकाळी 11 वा. उपस्थित रहावे आणि या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. कुर्वे यांनी केले आहे.