Breaking News

तालुक्यात आदर्शवत काम उभे करू : आ. मुरकूटे

नेवासा शहर प्रतिनिधी - तालुक्यातील धनगरवाडी येथे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या उपक्रमाचा शुभारंभ नेवासा येथील समर्पण फाउंडेशन व अनुलोम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नेवासा तालुक्यात आदर्शवत काम उभे करू, अशी ग्वाही आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.

यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, अनुलोमच्या उद्यमता विभागाच्या राज्य सदस्या सुजाता मराठे, अनुलोमचे पुणे विभाग प्रमुख अनिल मोहिते, बाळासाहेब मुळे, अनुलोमच्या नेवासा तालुका प्रमुख रणछोडदास जाधव, राहुरीचे मनोज संकलेचा, समर्पणचे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले,

सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार, खुपटीचे सरपंच गोरक्षनाथ तनपुरे, धनगरवाडीचे सरपंच राजेंद्र वाबळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. शासनाच्या गाळमुक्त धरण,गाळमुक्त शिवार या उपक्रमामुळे धनगरवाडी गावाला उज्वल भवितव्य लाभणार आहे. त्यामुळे गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी राज्यात आगळा वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. अनुलोमच्या नेवासा तालुक्याचे प्रमुख रणछोडदास जाधव यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 

यावेळी बोलतांना प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसीलदार उमेश पाटील, अनिल मोहिते, सुजाता मराठे आदींसह दत्तात्रय वरुडे, कल्याण शेजुळ, लॅब प्रमुख डॉ. जालिंधर गोरे, नगरसेवक सचिन नागपुरे, चंद्रकांत नेव्हल, अँड. बाळासाहेब कोरडे, बाळासाहेब वाल्हेकर, विठ्ठल डोईफोडे, भाऊसाहेब गवळी, मगन वाल्हेकर, शिवाजी काकडे, विजय कापसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.