Breaking News

चातुर्मास कार्यक्रम पत्रिका निर्णयाचे कोठारी यांचेकडून स्वागत

अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स दिल्लीचे अध्यक्ष मोहनलाल चोपडा व सर्व राष्ट्रीय सदस्य यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये जैन समाजातील चातुर्मास कार्यक्रमाची पत्रिका फोटोसह फोरकलर न छापता, साध्या पद्धतीने छापाव्यात या निर्णयाचे जामखेड जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी स्वागत केले. साधुसंतांचे फोटो असलेली पत्रिका काम झाल्यावर आपण फेकून देतो, ती पत्रिका कचरा कुंडीत जाते, किंवा कोणाच्या तरी पाया खाली येते. या मुळे जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. यासाठी राष्ट्रीय मुख्य युवा संरक्षक पारस मोदी आदींनी या निर्णयासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. यासाठी आचार्य प.पु. डॉ. शिवमुनीं म. सा. प. पु .अर्चनाश्री म. सा. महाराष्ट्र प्रवर्तक प.पु. कुंदनऋषी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तिनी प.पु. ज्ञानप्रभा म.सा., प्रवर्तिनी प.पु.चंदना म.सा., प्रवर्तिनी सुधा म.सा.प.पु. लोकेश ऋषि म.सा.प.पु. श्रेयांश ऋषि म.सा यांच्यासह सर्व साधुसंतांनी व अनेक श्री संघांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पत्रिका छापण्यात भरपूर पैसा खर्च होतो, त्यानंतर पत्रिकेचा काही उपयोग होत नाही. होणार्‍या पैशाचा उपयोग हा गोरगरीब लोकांना अन्नदान व गाईसाठी चारा, जीवदया अशा कामी खर्च करावा असे आव्हान पारस मोदी यांनी केले आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी जैन कॉन्फरन्सचे युवा अध्यक्ष शशीकांत कर्णावट, गणेश साखला आदींनी सहकार्य केले आहे. यावेळी जामखेड श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी यांनीदेखील पत्र दिले आहे.