Breaking News

पलूस-कडेगाव मतदारसंघ पोट निवडणूक तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित - अण्णासाहेब चव्हाण

सांगली,  - 285-पलूस-कडेगाव मतदारसंघ पोट निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दिनांक 26 एप्रिल 2018 रोजी घोषित केला आहे. त्यानुसार या पोट निवडणुक ीसाठी सोमवार, दिनांक 28 मे 2018 रोजी मतदान होणार असून निवडणूक प्रक्रिया शनिवार, दिनांक 2 जून 2018 रोजी पूर्ण होणार आहे. या निवडणूकीसंदर्भातील तक्रार दाखल करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली. 

या निवडणुकीसंदर्भातील तक्रार दाखल करण्याकरिता निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून गुरूवार, दिनांक 3 मे 2018 पासून ते शनिवार दिनांक 2 जून 2018 पर्यंत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली यांचे कार्यालय, सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली येथे 24 ु 7 तत्वावर नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार सादर करावयाची असल्यास ती नियंत्रण कक्षात 0233-2600700, मो. क्र. 9881517700 (निवडणूक नायब तहसिलदार एस एस. विभुते) या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे. 
राज्यस्तरावरही नियंत्रण कक्ष प्रस्थापित
11-भंडारा-गोंदिया, 22-पालघर लोकसभा व 285 पलूस-कडेगाव मतदारसंघ पोटनिवडणूक या निवडणुकीसंदर्भातील तक्रार दाखल करण्याकरिता निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून दिनांक 3 मे 2018 पासून ते दिनांक 2 जून 2018 पर्यंत कक्ष क्रमांक 611, निवडणुक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई 400032 येथे 24 ु 7 तत्वावर नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार सादर करावयाची असल्यास ती नियंत्रण कक्षात 022- 22026441, मो. क्र. 9619204746 या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी केले आहे.