३५ वासरांची पोलिसांनी केली सुटका!
संगमनेर/प्रतिनिधी। गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत संगमनेर खुर्द येथे काल {दि. १३} रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत खाटकाच्या तावडीत असलेल्या ३५ जीवंत वासरांची सुटका केली. नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर खुर्द गावातून एका पिकअपमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतुक केली जात असल्याची माहिती शहर पाेलिसांना अज्ञात व्यक्तीने दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी या कारवाईत पिकअप {क्र. एम. एच. १२ एफ. डी. २६५६} या संशयित पिकअपमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. संशयित वाहन पोलिसांच्या नजरेत येताच त्यांनी ते पकडले. पिकअपमध्ये त्यांना ३५ जिवंत वासरे आढळून आली. पोलिसांनी ही वासरे ताब्यात घेत सायखिंडी येथील जिवदया पांजरापोळमध्ये दाखल केली. पोलिस कॉन्स्टेबल अयुब शेख यांच्या तक्रारीवरुन नवाब जावेद कुरेशी (रा. भारतनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.