रस्तालूटप्रकरणी एक अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
राहुरी विशेष प्रतिनिधी - नगर मनमाड रोड कोल्हार ते लोणी दरम्यान रस्तालूट करणारया राहुरी शहरातील सहा तरुणांचा लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंजित गलांडे यांनी पाठलाग केला. मात्र यातील पाच आरोपी फरार झाले. यामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आले असून तो अल्पवयीन आहे. याप्रकरणी परमेश्वर विठ्ठल जाधव {रा. रोकडा ता अहमदपूर जि. लातूर } यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आज {दि. १४ } मध्यरात्री एकच्या सुमारास कोल्हार-लोणी रस्त्यावर परमेश्वर जाधव व त्यांचे सहकारी यांना छोटा हत्ती आडवा लावून पाचजण लुटत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. फिर्यादी जाधव यांना मारहाण होत असतांना लोणी पोलिसांची गाडी गस्तीवर आली असता लाईट दिसताच पाचही आरोपी बाजूच्या ऊसात पसार झाले. या आरोपींचा शोध घेत असतांना एक अल्पवयीन मुलगा पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतेले. पकडले असता त्याने पप्पु भाउसाहेब गायकवाड राहणार आजाद चौक राहुरी गौरव बबन गुलदगड राहणार तनपुरे वाडी रोड निलेश धोतरे,सतिश धोतरे राहणार लोहार गल्ली राहुरी रवी एकनाथ धनवटे राहणार तनपुरे गल्ली राहुरी यांची नावे सांगितली फिर्यादी हे एम एच २०ईजी २९६८ अशोक लेलड या गाडीत माल घेवुन चालले होते यांच्या कडुन रोख रक्कम ३७हजार व मोबाईल एकुन४८हजाराचा मुद्देमाल नेला आहे.सदर तरुण हे राहुरीतील असल्याने राहुरीत अल्पवयीन युवकांमधे गुन्हेगारी वाढ झाल्याचे या घटनेवरुन दिसुन येत आहे.यापुर्वी राहुरीत चांगल्या कुटूबातील तरुणांच्या टोळ्यावर राहुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.