Breaking News

हरित सैनिकांच्या नोंदणीने पार केला अर्ध्या कोटीचा टप्पा

मुंबई : राज्यात 50 लाख 12 हजार 766 हरित सेनेची फौज हरित महाराष्ट्राचे स्वप्नं साकार करण्यासाठी सज्ज झाली असून यामध्ये वैयक्तिक नोंदणीसह संस्थात्मक नोंदणीचा ही समावेश आहे. लोकसहभागातून महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन वाढावे, वृक्ष आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी 1 कोटीची हरित सेना निर्माण करण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प आहे. त्यांच्या या संकल्पाला राज्यभरातून मोठे बळ मिळत असून अर्ध्या कोटीपर्यंतची वाटचाल लोकांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. नोंदणी झालेल्या हरित सैनिकांमध्ये 19 लाख 88 हजार 938 वैयक्तिक हरित सैनिक आहेत तर 30 लाख 23 हजार 828 हरित सैनिक हे संस्थात्मक स्वरूपातून सदस्य झाले आहेत.

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढावा त्याचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे म्हणून वन विभागाने महाराष्ट्र हरित सेना स्थापन करण्याचे निश्‍चित केले आणि राज्यभरातून त्याला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. या चळवळीत सहभागी होण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी हीींिं://ुुु.सीशशपरीाू.ारहरषेीशीीं.र्सेीं.ळप या तसेच हीींिं://ुुु.ारहरषेीशीीं.पळल.ळप या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक हा देशांच्या सीमांचे रक्षण करतो तर हरित सेनेच्या माध्यमातून हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारलेला सैनिक हा खर्‍या अर्थाने पर्यावरण संरक्षणाचा दूत म्हणून काम करत असल्याचे वनमंत्री सांगतात.
वन विभागाने हरित सेनेच्या स्वंयसेवकांची भूमिका स्पष्ट करतांना त्यांचा सहभाग अपेक्षित असलेली क्षेत्रं निश्‍चित करून दिली आहेत. जसे वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरिता सामुहिक गस्त, वणव्याच्या हंगामात वन वणवा विझवण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग, वन्य प्राण्यांच्या गणनेत सहभाग, वन विभागामार्फत साजर्‍या केल्या जाणार्‍या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासारख्या दिन विशेषांच्या कार्यक्रमात, वनमहोत्सव, वन्यजीव सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात हरित सेनेच्या सदस्याना सहभागी होता येणार आहे. हरित सेनेच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर या सर्व विषयांची सविस्तर माहिती मिळते. शिवाय याठिकाणी वन विभागाची दिनदर्शिकाही देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेप्रमाणेही हरित सेनेचे सदस्य कार्यक्रम घेऊन पर्यावरण-वन रक्षणात आणि संवर्धनात आपले योगदान देऊ शकतात.