Breaking News

हरित सैनिक नोंदणीत अग्रेसर मराठवाडा


नेहमी पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या मराठवाड्याने हरित सैनिकाच्या नोंदणीत मात्र पुढाकार घेतला आहे. लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असून जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 15 हजार 270 जणांनी ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद दुसर्‍या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 4 लाख 1 हजार 105 जणांनी हरित सैनिकाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तिसर्‍या क्रमांकावर बीड जिल्हा आहे. येथे 3 लाख 55 हजार 571 हरित सैनिक आहेत. हरित सैनिकाच्या नोंदणीत पहिले तीन ही जिल्हे मराठवाड्यातील आहेत. इथे वारंवार भेडसावणारी पाणी टंचाई दूर व्हावी, येथील वृक्षाच्छादन वाढावे आणि दुष्काळाला हद्दपार करता यावे यासाठी मराठवाड्यातील जनतेने घेतलेला हा पुढाकार निश्‍चित कौतूकास्पद आहे. हरित सैनिकांच्या नोंदणीमध्ये नाशिक 2 लाख 79 हजार 111 हरित सैनिकांसह चौथ्या स्थानावर आहे तर 2 लाख 36 हजार 304 नोंदणीसह चंद्रपूर राज्यात पाचव्या स्थानावर आहे.