Breaking News

शहिदांच्या पत्नींना एसटीचा आजीवन मोफत प्रवास

भारतीय सैन्य, सुरक्षा दलातील शहीद जवानाच्या पत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून अाता आजीवन मोफत प्रवास करण्याची सवलत मिळणार अाहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान याेजनेअंतर्गत या याेजनेची १ मेपासून अंमलबजावणी होत आहे. 

राज्यात एकूण ५१७ वीरपत्नींना या याेजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रदिनी मुंबईतील पाच वीरपत्नींना माेफत प्रवासाचे स्मार्ट कार्ड वितरित होणार आहे. तसेच शहीद जवानांच्या एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एसटी महामंडळात नाेकरी देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष अाणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.